निरा नदीवरील लाटे येथील नवीन दोन पदरी पुलाला तातडीची मंजुरी - अजितदादा पवार
कोऱ्हाळे बु|| - निरा नदीवरील लाटे येथील 50 वर्षपेक्षा जुना असणाऱ्या बंधाऱ्याच्या जागी आता नवीन दोन पदरी पूलाला अजितदादा पवार यांनी आज तातडीची मंजुरी दिली.
बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता ओव्हाळ साहेब यांनी आज तातडीचा सर्वे करून 13 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले आहे त्याला अजितदादा पवार यांनी तातडीची मंजुरी दिली आहे.
कोऱ्हाळे बु|| मार्गे फलटण ला जोडणारा महत्वाचा पूल म्हणून हा पूल ओळखला जातो.
चालू स्थितीतील पुलाला कठडे नाहीत व पूल वाहतुकीसाठी अरुंद आहे. या पुलावरून कित्येक वर्षे जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करत आहेत. यावर्षी पावसाळ्यात निरा नदीला पूर आल्याने 1 महिना हा पूल वाहतुकीसाठी बंद होता.
अवजड वाहतूक करणाऱ्यांना सांगवी मार्गे फलटणला जावे लागत असल्याने 12 किमी अंतर वाढत होते आता या पुलाला दोन पदरी मंजुरी मिळाल्याने वेळ व इंधनाची बचत होणार आहे.
या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागतच होणार आहे.