"मी जर एकदा ठरवलं ना बारामती कोरोनमुक्त करायची"तर करूनच दाखवतो" या डायलॉग सह.. अजित पवारांवर बारामतीच्या नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव...
बारामतीतील उपचार सुरु असलेल्या एका कोरोनाग्रस्तानेही कोरोनावर मात केली असल्याचे आज स्पष्ट झाले आहे . त्यामुळे बारामती कोरोनामुक्त झाली आहे. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे .
महिनाभरापासून बारामतीकर कोरोनाशी दोन हात करत आहेत .रुग्णांची संख्या वाढताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये वेगळा पॅटर्न राबवून बारामती तालुका कोरोना मुक्त करण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार प्रशासनाला लागेल ती मदत करण्यात आली. श्रीरामनगर भागात एका रिक्षाचालकाला कोरोना झाल्याचे मार्च मध्ये स्पष्ट झाले होते. तो रुग्ण उपचारानंतर आता पूर्ण बरा आहे. त्यानंतर समर्थनगर भागातील एका भाजी विक्रेत्याला कोरोना झाला. त्याचा मुलगा, सून व दोन नाती यांनाही कोरोनाने गाठले. यात भाजी विक्रेत्याचा म्रूत्यू झाला. परंतु त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली.
म्हाडा कॉलनी भागातील ज्येष्ठ कोरोना संक्रमित झाला होता. त्याच्यावर आज अखेर उपचार सुरु होते. परंतु त्यांनीही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यांची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. शहरात सातपैकी एकाचा मृत्यू झाला तर अन्य सहाजणानी कोरोनावर यशस्वी मात केली. म्हाडा कॉलनीतील रुग्णालाही लवकरच गुरुवारी सोडण्यात आले.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात माळेगावात मधील लकडेनगर येथे एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचे अहवाल निगेटीव्ह आलें आहेत. त्यामुळे या भागातील प्रतिबंधीत क्षेत्राचा कालावधी आज संपला आहे. .
रेड झोन बदलणार...
डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी, बारामती.
बारामती तालुक्यात कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्याने तालुका रेड झोनमध्ये गेला होता. परंतु आठपैकी दोघांचा मृत्यू झाल्यावर अन्य सहाजण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर तालुक्यात कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे बारामती रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये प्रवेश करेल.
प्रशासनातील, प्रामुख्याने आरोग्य विभाग, महसूल पोलीस प्रशासन यांनी केलेलं कामं अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना बारामतीकर नागरिकांमध्ये आहे. यात अनेक सामाजिक संघटनाचाही सहभाग होता.
बारामती शहरात राबविलेल्या पॅटर्न मध्ये, प्रांतअधिकारी, दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील,महसूल प्रशासनातील सर्व कर्मचारी अधिकारी, डी. वाय. एस पी.. नारायण शिरगांवकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, अण्णासाहेब घोलप, आणि सर्व पोलीस कर्मचारी डॉ मनोज खोमणे, आणि त्यांचा स्टाप नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, आणि नगरपालिकेचा स्वच्छता विभाग, आणि काही सामाजिक संस्था यांनी प्रचंड कष्ट घेतले.