-->
बारामतीत कोरोनाचा दुसरा पेशंट, प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन

बारामतीत कोरोनाचा दुसरा पेशंट, प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन

बारामतीमध्ये आज दिनांक   06 एप्रिल 2020  रोजी  अजून एका रुग्णास कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे सिद्ध झाले आहे. तो रुग्ण समर्थनगर बारामती येथील असून त्यांच्या कुटुंबाचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक लोकांना बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बारामतीकरांना नम्र विनंती आहे की कोणीच बाहेर फिरू नये घरात राहावे. 
     सदरची परिस्थिती लक्षात घेता समर्थ नगर हे केंद्र (Center) धरुन 3 किमी परिसरात Containment झोन म्हणुन व तेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करणेत येत आहे. त्या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करणेत येत आहे. अत्यावश्यक सेवा यांना यातुन वगळले आहे. हे आलेले संकट लक्षात घेता नागरिकांनी अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू नये. Containment झोनच्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करणेत आली आहे. तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येतील.तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत  survey करणेत आहे. सर्वांना विनंती प्रशासनास सहकार्य करावे. 
 प्रांताधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर बारामती



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article