-->
चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे  : -  कोरोना विषाणूंचा ( COVID – 19) प्रसार होऊ नये तसेच जिल्हयात अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असल्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष  नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. 


              पुणे जिल्हयात   कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता, अनिवार्य सामाजिक अंतर ( Social Distance) या उपाययोजना व्यतिरिक्त्‍ तोंडावर मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार परस्परांशी संपर्क साधणा-या व्यकती करिता कमी होऊ शकतो. तसेच कोरोना विषाणूच्या प्रसारास आळा बसू शकतो त्यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयांमध्ये तसेच इतर ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी व्यापक जनहिताच्या दृष्टीने तोंडावर मास्क परिधान करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी कळविले आहे.


याशिवाय कोणत्याही हेतूसाठी व कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जसे की, रस्ता, रुग्णालय,कार्यालय, बाजारपेठ इत्यादी बाहेर जातील त्यावेळी व्यक्तीने 3 प्लाय मास्क किंवा कपडयाचा मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. सर्व व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक किंवा खाजगी वाहनाने प्रवास करते वेळी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम व इतर सर्व कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रातील सर्व कार्यालयांमध्ये प्रवेश करणा-या सर्व अभ्यागतांनादेखील चेह-यावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांना कार्यालयात प्रवेश देण्यात येणार नाही, असेही जिल्हाधिकारी राम यांनी स्पष्ट केले.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article