बारामतीत कोरोनाग्रस्ताचा पहिला बळी
Thursday, April 9, 2020
Edit
बारामती : कोरोनाची लागण झालेल्या बारामतीतील ६० वर्षीय भाजी विक्रेत्याचा आज (दि.९) पहाटे मृत्यू झाला. बारामतीत एकूण 6 रुग्ण होते त्यापैकी एकाचा कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे. पुण्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. या भाजी विक्रेत्याचा मुलगा, सून व अनुक्रमे एक व आठ वर्षीय नातसुध्दा कोरोनाग्रस्त आहे. त्यांच्यावर पुण्यातच उपचार सुरू आहेत.
दरम्यान कोरोनाग्रस्त भाजी विक्रेत्याला यापूर्वी अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती क्षीण झाली होती. त्यातच कोरोनाने गाठल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने बारामतीत खळबळ उडाली आहे.
अजूनही लोक रस्त्यावर फिरत असून लोकांनी घरातच राहणे गरजेचे आहे.