-->
बारामतीत दिगंबर जैन देवस्थान  व पुलक मंच च्या वतीने गरजूंना मोफत अन्नदान 

बारामतीत दिगंबर जैन देवस्थान  व पुलक मंच च्या वतीने गरजूंना मोफत अन्नदान 

कोरोनाच्या  संकटात दिगंबर जैन देवस्थानचा आधार 


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभर हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत अनेकांची अन्नपाण्यावाचून दैना होऊ नये म्हणून बारामती येथील श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थानच्या वतीने गरजू नागरीक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मोफत अन्नदान करण्यात येत आहे.
बारामती शहरात कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून कठोर पावले टाकण्यात आले आहेत. या परिस्थितीत गरजू व सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बारामतीतील श्री मुनिसुव्रत महाराज दिगंबर जैन देवस्थान व पुलक मंच च्या वतीने मोफत अन्नदानाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत बारामती शहरातील नगरपरिषद, एमआयडीसीत बाहेरून आलेले कामगार, गरजू नागरीक अशा समाजातील विविध घटकांना मोफत आणि मुबलक जेवण पुरविण्यात येत आहे. 
    बारामती शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संबंधित गरजूंची गैरसोय टाळण्यासाठी लॉक डाऊन सुरु असेपर्यंत हे अन्नदान केले जाणार आहे.  देवस्थानचे विश्वस्त, समाजातील ज्येष्ठ, पुलक मंच यांच्या मार्गदर्शनाखाली टी.सी. कॉलेजचे  कँटीन मालक व कर्मचारी हे काम करीत आहे.    



 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article