स्फोटाच्या आवाजाने बारामती हादरली
Friday, May 1, 2020
Edit
बारामती : आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास गूढ स्फोटाच्या आवाजाने बारामती हादरली. हा स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर्स पर्यंत ऐकू गेला. या आवाजाने बारामतीतील अनेक अपार्टमेंटमधील लोक भीतीने घराबाहेर आले होते. वायुदलाच्या विमानांचा सराव सुरु असल्याने वेगाने विमान गेल्यामुळे हवेचा दाब निर्माण होऊन स्फोटासारखा आवाज आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
या संदर्भात पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता पावणेअकराच्या सुमारास स्फोटासारखा आवाज झाला, अनेक इमारतीच्या काचा हादरल्या, काही इमारतीही हादरल्या पण नेमक काय झाले हे समजू शकलेले नाही, असे त्यांनी सांगितले.
याच सुमारास आकाशात वायुदलाच्या विमानांचा सराव सुरु असल्याने वेगाने व हवेचा दाब निर्माण झाल्याने स्फोटसदृश आवाज निर्माण झाला असावा असा अंदाज आहे.