सोमेश्वरचे माजी व्हाईस चेअरमन रामचंद्र बापू भगत यांचे निधन
Wednesday, July 8, 2020
Edit
कोऱ्हाळे बु|| - बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बु येथील रामचंद्र भगत यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले.
भगत बापू हे शेतकऱ्यांचे हित जपणारे होते. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव प्रत्येकाला आवडायचा. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
भगत बापू हे श्री सोमेश्वर कारखान्याचे 10 वर्ष माजी व्हाईस चेअरमन होते. तर संचालक म्हणून 27 वर्ष कारभार पाहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोऱ्हाळे बु ग्रामपंचायत व श्री सिद्धेश्वर विकास सोसायटी योग्य प्रकारे काम पाहत होती.
त्यांचा अंत्यविधी राहत्या घरी दुपारी 1.30 वा. होणार आहे.