बारामती ; आज ४ पॉझिटिव्ह, एकूण ११५, मृत्यू ११
बारामती - काल घेतलेल्या 69 नमुन्यांपैकी उर्वरित 14 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक अहवाल प्रतीक्षेत आहे असे एकूण 69 पैकी 66 अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व एक अहवाल प्रतीक्षेत आहे तसेच शहरातील वडूजकर इस्टेट श्रीराम नगर भिगवण रोड येथील एक 62 वर्षाची महिलेचा अहवाल पुणे येथील लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे, असे एकूण दिवसभरामध्ये तीन रुग्ण बारामती शहरांमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत व बारामती तालुक्याची रुग्णसंख्या 114 झालेली आहे.
काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित प्रतीक्षेत असलेला एक अहवाल प्राप्त झाला असून जैनकवाडी येथील 65 वर्षे पुरुष चा अहवाल पॉझिटिव आलेला आहे आज दिवसभरात बारामती मध्ये चार रुग्ण आढळून आले असून बारामती तालुक्याची रुग्णसंख्या 115 झालेले आहे, तसेच बारामती शहरातील जामदार रोड येथील रुग्णाचा उपचारादरम्यान पुणे येथे मृत्यू झालेला आहे
आज दिनांक 26/7/20 रोजी कोरोना अपडेट खालील प्रमाणे
आज पर्यंत बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 115 त्यापैकी बरे झालेले रुग्ण 62 व वेगवेगळ्या सेंटर मध्ये व दवाखान्यात उपचार घेत असणारे रुग्ण 40 व घरी उपचार घेत असणारे रुग्ण 02 असे एकूण 42 रुग्ण उपचार घेत आहेत व 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे