लॉकडाऊनचे उल्लंघन; सोनकसवाडीतील 9 जणांवर गुन्हा दाखल
कोऱ्हाळे बु - वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने आज महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 37(1)व (3)प्रमाणे १) संतोष शिवाजी सणस वय ४० वर्षे २) सागर चंद्रकांत शेजाळ वय २९ वर्ष ३) सुरेश पांडुरंग फाळके वय ५२ वर्ष ४) लक्ष्मण किसन राजगुरू वय ६५ वर्षे ५) संजयराव श्रीपती जगताप वय ७३ वर्षे ६) तुषार शिवाजी शेजाळ वय २३ वर्ष ७) संदीप गजानन गुळूमकर वय- ३० वर्ष ८) महावीर पांडुरंग फाळके वय- ३८ वर्ष ९) सागर लक्ष्मण राजगुरू वय ३० वर्ष सर्व रा.सोनकसवाडी ता.बारामती जि.पुणे यांच्यावर पो.कॉ. सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
हकीकत अशी की, आज दिनांक १७/०९/२०२० रोजी सायं १८.३० वा.सुमा. मौजे सोनकसवाडी गावचे हद्दीतील गावठाण मधील श्री हनुमान मंदिर सभामंडप या ठिकाणी यातील नमुद आरोपीतांनी हे मा.जिल्हाधिकारी सो. पुणे यांचे वरील आदेशाचे उल्लंघन करुन एकत्रीत बसलेले मिळुन आले वगैरे मजकुरचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा प्रथमवर्दी रिपोर्ट मा.JMFC कोर्ट बारामती यांना रवाना करण्यात आला आहे, सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना./२०८८ श्री.कल्याण खांडेकर हे करीत आहेत.