काटेवाडी शाळेतील श्री बापू तांदळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
काटेवाडी - आदरणीय सुनेत्रा वहिनी साहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी या शाळेतील उपशिक्षक श्री बापू तांदळे यांना शिक्षक दिनानिमित्त बारामती पंचायत समिती कडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी जाहीर झाला . शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून दरवर्षी तालुक्यातून काही निवडक शिक्षकांची निवड करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. श्री बापू तांदळे यांनी मागील बारा वर्षापासून तालुक्यात उत्कृष्ट काम केले आहे. माझ्या कामाची पोचपावती या पुरस्कारांना मला मिळाली असे उदगार बापू तांदळे यांनी काढले.
काटेवाडी गावचे सरपंच श्री विद्याधरजी काटे व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले तसेच मागील दोन वर्षात शिक्षकांनी शाळेमध्ये चांगल्या जोमाने काम करून शाळेचा विकास केल्यामुळेच सरांना पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सुचित केले. केंद्रप्रमुख श्री विजय जाधव साहेब संदीप दळवी सर काटेवाडी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय काळे उपाध्यक्ष सौ उमा काटे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ राणी ढमे मॅडम शाळेतील उपशिक्षक श्री धनपाल माने सर, सौ वनिता सोडमिसे, सौ नर्मदा शिंदे, सौ गितांजली देवकर, जयश्री चांगण ,संतोष सातपुते, सोनाली तांदळे , लीना दळवी यांनी श्री बापू तांदळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.