-->
बारामती; आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाला सुरुवात

बारामती; आरोग्य विभागामार्फत कोरोना लसीकरणाला सुरुवात

बारामती - पंचायत समिती बारामती आरोग्य विभागामार्फत
कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता.
      आज दिनांक १६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे तालुकास्तरीय कोरोना लसीकरण शुभारंभ मा. उपविभागीय अधिकारी श्री दादासाहेब कांबळे साहेब, मा. गटविकास अधिकारी श्री राहुल काळभोर साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ मनोज खोमणे सर, उपमुख्यमंत्री महोदय यांचे स्वीय सहाय्यक श्री. हनुमंत पाटील साहेब, मा मुख्याधिकारी बा.न.प. श्री किरणराज यादव साहेब, वैद्यकीय अधिकारी डाॅ जनार्दन सोरटे, डाॅ बी एन दडस, डाॅ मेघा पदमाने यांचे शुभहस्ते करण्यात आले. 
      याप्रसंगी  सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते. 
       यावेळी  तालुका आरोग्य अधिकारी यांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन आरोग्य कर्मचारी यांना केले.
    जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना योद्धा यामध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांना सिरम इन्स्टिट्यूट यांची कोविसील या लसचे 120 डोस सकाळी 9 ते 5 या वेळेत करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची कोविन ऍपवर नाव नोंदणी करण्यात आली आहे अशा लोकांना मेसेज व फोनद्वारे कळविण्यात येत आहे. 
     केलेल्या नियोजन व उपाययोजना सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरण झालेल्या कर्मचारी यांना कोणतीही गुंतागुंत त्रास झाला नाही.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article