
रविवारी थोपटेवाडीत पेन्शनधारकांचा मेळावा
Saturday, February 13, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी येथे इ.पी.एस. 1995 पेन्शनधारकांसाठी सोमेश्वरनगर पेन्शनधारक संघटनेमार्फत पेन्शनधारकांचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णराव (नारायणराव) नलवडे यांनी दिली.
29/01/2021 रोजीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भात व पेन्शन वाढीच्या संदर्भात मेळावा आयोजित केला आहे.
मेळाव्यात श्री.दिघे साहेब, श्री. गोपाळ कुलकर्णी, श्रीकांत इनामदार, अविनाश बडवे,श्री. लोंढे मार्गदर्शन करणार आहेत. तरी महावितरण, एसटी महामंडळ, सोसायटी सेक्रेटरी, साखर कामगार, माजी कर्मचाऱ्यांनी रविवार दि.१४ रोजी दुपारी 2 वाजता नलवडे यांच्या निवासस्थानी (सावंतवस्ती, थोपटेवाडी, लाटे-कठिणपुल रोड) येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे नलवडे यांनी सांगितले.