
वाघळवाडी : बालाजी मशरूम कंपनीच्या बगॅसला आग
Monday, February 8, 2021
Edit
बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील बालाजी मशरूम कंपनीतील बगॅस ला आग लागल्याने चार हजार टन बगॅस जळून खाक झाला. यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी शॉर्टसर्किट ने वाघळवाडी येथील बालाजी मशरूम कंपनीतील कंपोस्ट यार्ड मधील बगॅस ला आग लागली. याठिकाणी कंपनीचा आठ ते साडेआठ हजार टन बगॅस होता. यामध्ये अचानक आग लागल्याने यामधील तीन ते साडेतीन हजार टन बगॅस जळून खाक झाला. निरा जुबिलियंट आणि सोमेश्वर कारखान्याचे अग्निशामक बंब सायंकाळी उशिरा पर्यंत आग विझवण्याचा प्रयन्त करत होते