
कोऱ्हाळे बु गावात विकासकामांचा धडाका सुरू
Tuesday, March 9, 2021
Edit
कोऱ्हाळे बुद्रुक - हेमंत गडकरी
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी निवड झाल्यानंतर युवा सरपंच रवींद्र खोमणे यांनी विकासकामांचा धडाका लावला असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे आता वेगाने होवू लागली आहेत.
कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीत नुकतेच सत्तांतर झाले असून गावची सत्ता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांच्या गटाकडे आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र खोमणे यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. सरपंचपदी आरूढ झाल्यानंतर रवींद्र खोमणे यांनी लागलीच लोकांच्या समस्या सोडवण्यास सुरूवात केली आहे. दलित वस्ती असलेल्या समता नगर येथील लोकांची कचऱ्याची मोठी समस्या होती. अनेक वर्षांपासून कचरा कुंड्यातील कचरा उलचला नसल्याने कचरा कुंड्या ओसंडून वाहत होत्या. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर कचरा येत होता. त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांना मोठा त्रास होत होता. सरपंच रवींद्र खोमणे यांनी लोकांच्या प्रश्नाची दखल घेत कचरा कुंड्या मोकळ्या केल्या असून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली. त्यामुळे समता नगर येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून सरपंच रवींद्र खोमणे यांचे आभार मानले आहेत.
याशिवाय गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील पथदिवे बंद अवस्थेत होते. सध्या पंचक्रोशीत चोरांच्या अफवेचा सुळसुळाट झाला आहे त्यातच रस्त्यावर अंधार असल्याने लोक भयभीत झाले होते. त्यामुळे रवींद्र खोमणे यांनी वीजेच्या खांबावरील सर्व पथदिवे बदलले असून रस्त्यावर लखलखाट झाला आहे. येणाऱ्या काळात आठवड्यातील एक दिवस गावच्या स्वच्छतेसाठी काम करणार असल्याचे सरपंच रवींद्र खोमणे यांनी सांगितले.
कचऱ्याच्या समस्येचा प्रश्न सोडवताना सरपंच रवींद्र खोमणे, सदस्य राजू पवार