
उद्या रात्री 8 वाजल्यापासून महाराष्ट्रात 15 दिवसांची संचारबंदी
Tuesday, April 13, 2021
Edit
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांचे प्राण वाचवणे एवढाच हेतू असल्याचे सांगत उद्या रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात 144 कलम लागू करण्याचा आदेश दिला आहे. उद्या रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात पंधरा दिवस लॉकडाऊन सारखीच स्थिती राहील. मात्र त्यामध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आत्ता जे निर्बंध लावत आहोत, ते केवळ सगळ्यांच्या हितासाठी आहे. मला यामध्ये आनंद होतोय असे समजून घेऊ नका. गेली महिनाभर मी सर्वांना कल्पना देत होतो, बराचसा वेळ घालवलेला आहे, तेव्हा आता काही निर्बंध लोक डाऊन सारखेच असणार आहेत. ही साखळी तुटली नाही तर आपल्याला ही साखळी अत्यंत अडचणीत आणेल. साथी विरोधात एकत्र लढण्याची गरज आहे. आज पर्यंतच्या निर्बंधांमध्ये अधिक वाढ करत आहोत. हे निर्बंध उद्या रात्री आठ वाजल्यापासून लागू राहतील.
पंढरपुर मतदारसंघात मतदान होणार आहे. या मतदारसंघात मतदान होणार आहे, ते मतदान झाल्यानंतर तिथे देखील लॉकडाऊन होणार आहे. उद्या रात्री आठ वाजल्यापासून लोकडाऊन सारखेच निर्बंध राहतील. हे निर्बंध उद्या रात्रीपासून ब्रेक द चेन असे असतील. यासाठी राज्यात 144 कलम लागू होणार आहे. आता पूर्ण पंधरा दिवस राज्यांमध्ये संचारबंदी लागू होणार आहे. अनावश्यक येणे-जाणे बंद करावे लागणार आहे.
कोणत्याही व्यक्तीने आवश्यकता किंवा योग्य कारण नसेल तर घराबाहेर पडू नये. आता कोरोनाला मदत करायची की, कोरोना विरोधात लढणाऱ्या सरकारला मदत करायची ठरवावे लागेल हा निर्णय जनतेलाच घ्यावयाचा आहे. उद्या रात्री आठपासून घराबाहेर पडू नका. सकाळी सात ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरुवातील. मात्र सरकारी आस्थापने पंधरा दिवस बंद राहतील.
जीवनावश्यक सेवा सुविधा देणारी वाहतूक फक्त चालू राहील. सार्वजनिक सेवा सुरू राहील. दवाखाने, वैद्यकीय विमा, औषध दुकाने, वैद्यकीय सेवा देणारे व वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक, त्यांचे कारखाने, मास्क, जंतुनाशक उत्पादन व इतर वैद्यकीय सामान आणि जनावरांची संबंधित दुकाने सुरू राहतील. वेअरहाऊसिंग, रेल्वे, बस, विविध देशांची राजनैतिक कार्यालयं तसेच तोंडावरती पावसाळा आलेला असून पावसाळ्याची संबंधित जी कामे असतील ती सुरू राहतील.
दूरसंचार सेवा, सेबीने मान्यता दिलेली कार्यालयं, ई-कॉमर्स, अधिस्वीकृती धारक पत्रकार, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, डेटा सेंटर सुरु राहतील. बाकीचे सर्व बंद राहील. बांधकामाशी संबंधित जिथे बांधकामाच्या ठिकाणी सुविधा असेल, मजूरांना राहण्यासाठीची त्या ठिकाणी सुविधा असेल, अशी फक्त बांधकामे सुरू राहतील. हॉटेल साठी फक्त पार्सल ची सुविधा चालू राहील. रस्त्याच्या कडेचे स्टॉल चालू राहतील, मात्र पार्सलसाठीच हे सारे सुरू राहील. रस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत पार्सल ची व्यवस्था करता येईल.
आताची कोरोना ची लाट अधिक तीव्र असून जे निवृत्त वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, परिचारिका असतील, त्यांनी वेळ आलेली आहे असं समजून महाराष्ट्राच्या आरोग्यात मदत करावी कोरोनावर जिद्दीने मात करावी लागेल. जे आता एम बी बी एस साठी शिकत आहेत व शिकलेले आहेत अशांनी मदत करण्याची गरज आहे.
पंतप्रधानांनी वैयक्तिक लाभासंदर्भात काही निर्णय घ्यावा, मात्र महाराष्ट्रात अन्नसुरक्षाशी संबंधित निर्णय घेण्यात येणार असून प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ याप्रमाणे एक महिनाभर हे मोफत दिले जाणार आहे. सात कोटी नागरिकांना या अत्यावश्यक सेवा मिळतील. रोजी बंद झाली तरी रोटी मात्र चालू राहील. शिव भोजन योजना कोरोना आल्यानंतर पाच रुपये प्रति लाभार्थी अशी करण्यात आली होती. आता शिव भोजन योजना पुढील एक महिनाभर शिवभोजन मोफत देणार आहोत. बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत कामगार कल्याण मंडळ कडून पंधराशे रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाणार असून, परवानाधारक बारा लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांना त्याचा फायदा होईल. परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत.
आता उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र माफ करणार नाही. आता राजकारण बाजूला ठेवा हे फार मोठे संकट आहे आपण आता एकत्र येऊन लढलो नाही तर आपल्याला काळ माफ करणार नाही रोज पन्नास हजार रेमेडीसीव्हीर महाराष्ट्रामध्ये लागत आहेत असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.