
थोपटेवाडी; सदस्यांविना ग्रामपंचायतीची मासिक सभा तहकूब
Monday, April 12, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीची आज मासिक मिटिंग होती पण मिटींगला फक्त 9 पैकी फक्त 3 जण त्यामध्ये सरपंच रेखा बनकर, सदस्य पृथ्वीराज नलवडे आणि शिवाजी कोरडे हेच उपस्थिती असल्याने कोरम अभावी सदर मिटिंग तहकूब करण्यात आली.
ग्रामपंचायतीत 10 वर्षांनंतर सत्तांतर झाले. नवीन सदस्य बॉडीची ही दुसरी मिटिंग होती. मिटींगला जर फक्त सरपंच व 2 सदस्य हजर राहत असतील तर गावाच्या विकासाकडे कोण लक्ष देणार? गावातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न आहेत त्यामध्ये गावचा पाणीप्रश्न गंभीर आहे, रस्ता, दिवाबत्ती अश्या अनेक मूलभूत सेवांपासून गाव वंचित आहे. तसेच गावात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
मासिक मिटिंगचा अजेंता देऊनही ज्या सदस्यांना ग्रामस्थांनी निवडून दिले त्या 9 पैकी 6 सदस्य गैरहजर राहिले, सदर तहकूब मिटिंग 15/04/2021 रोजी होणार आहे.
अशाच जर मिटिंगा तहकूब होत चालल्या तर गावचा विकास खुंटणार यात शंका नाही.