
आणि जेंव्हा पुरंदरचे आमदार इंग्रजीत बोलले. खडे बोल सुनवताच ज्युबिलंटचे अधिकारी नरमले
नीरा- पुरंदरचे आमदार संजय जगताप निरेतील ज्युबिलंट स्कुल मध्ये आले असता,
ज्युबिलंटचे अधिकारी याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास असमर्थथा दर्शवत
होते. या आधी तहसीलदार, तर काल प्रत्यक्ष आमदार आले तरी हे अधिकारी
वेगवेगळी कारणे सांगत होते. आम्हाला कॉरपरेटला सांगावे लागत, व्यवस्थापक
जबाबदारी घेत नाही हीत, आमच्याकडे मनुष्यबळ नाही. आमदारांन सोबत काही
कार्यकर्ते व माध्यमांचे कँमेरे सुरू असल्याने आमदार विनंती करत होते.
मात्र एका क्षणाला आमदारांचा पारा चढला व चक्क इंग्रजीत काही तरी खडे बोलले
आणि एका क्षणात कंपनीचे अधिकारी नरमले व शाळा द्यायला तयार झाले. हे पाहुन
कार्यकर्त्यांसह पत्रकार आवाक झाले.
नीरा (तर. पुरंदर) येथील ज्युबिलंट इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये कोरोना
सेंटर सुरु करण्यासाठीची पाहणी करण्यासाठी आ. संजय जगताप आले होते.
त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी जगताप बोलत होते. यावेळी नीरेचे उपसरपंच
राजेश काकडे, मा. जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, सदस्य संदिप धायगुडे,
पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने, तालुका आरोग्य अधिकारी
विवेक आबनावे, तलाठी बजरंग सोनवले, पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, सहाय्यक
पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, ग्रामसेवक मनोज डेरे, कोतवाल अप्पा लकडे,
दत्ता निंबाळकर ज्युबिलंटचे पी.आ.रो. इसाक मुजावर, अजय ढगे यांनी कोरोना
सेंटर बाबत चर्चा केली.
ज्युबिलंट शाळेची पाहणी केल्यानंतर आमदार.संजय जगताप यांनी प्रसिद्धी
माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळे ते म्हणाले, प्रयत्न किती ही केले तरी ते
तोकडे पडत आहेत, कारण किती ही भौतिक सोयसुवीधा उपलब्ध करू, पण वैद्यकीय
क्षेत्रात काम करणारे कर्मचारी कुठून आणायचे हा प्रश्न आहे. लोकांनी कोरोना
संसर्ग होणारच नाही याची काळजी स्वतः घेणे गरजेचं आहे. लक्षणे दिसता वेळीच
टेस्टींग करणे गरजेचे आहे. जास्त दिवस झाल्यावर ऑक्सिजन किंवा
व्हेंटिलेटरवर रुग्ण जातो व धोका वाढतो. हे टाळायचे असल्यास कोरोनाची
त्रीसूत्री अवलंबल्यास तुम्ही स्वतः कोरोनाला दुर ठेवू शकता. असा मत
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी केले.
ज्युबिलंट इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये विलगीकरण केंद्र सुरु करावे अशी
मागणी नीरा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याकडे केली
होते. या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे व सरपंच तेजश्री
काकडे यांनीही मागील आठवड्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या पुणे येथील निसर्ग
कार्यालयात प्रत्यक्ष भेटून लेखी पत्र दिले होते. नुक्तेच या ठिकाणी
पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी ही भेट दिली होती.
ज्युबिलंट इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये दहा वर्गखोल्या असून, प्रशस्थ
मैदान व वाहन पार्किंगची सोय आहे. त्यामुळे प्रथमीक स्वरुपात लक्षणे
असलेल्या पन्नस रुग्णांना याठिकाणी विलगीकरण करता येऊ शकते.