-->
बारामती: ट्रॅक्टर, दुचाकी चोर गजाआड; सव्वा आठ लाखांची वाहने जप्त; तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची कामगिरी

बारामती: ट्रॅक्टर, दुचाकी चोर गजाआड; सव्वा आठ लाखांची वाहने जप्त; तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची कामगिरी

बारामती : बारामती व इतर परिसरात दुचाकी चार चाकी जड वाहनांच्या चोरीचे प्रकार सर्रास सुरू होते. त्यानुसार बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे चोरीस गेलेली ८ लाख २० हजार रूपये किमतीची वाहने ताब्यात घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ट्रॅक्टरसह ७ मोटार सायकली, दोन क्राॅस कंपनीचे रेंजर सायकल,तसेच विहीरीतील विजपंपाची २०० मीटर केबल जप्त केली आहे.
मागील काही दिवसापासून बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हददीतून मोटार सायकल चेारीस जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली होती.

    त्यानुसार पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख यांनी मोटार सायकल चोरी उघड करण्या बाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने गुन्हे पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे संशयित नवनाथ केरबा सोनवणे (वय २५) रा.ढेकळवाडी (ता.बारामती जि.पुणे ) याच्यासह एक अल्पवयीन बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चोरीचा छडा लावण्यासाठी कसून चौकशी करून त्यांनी चोरीची कबुली दिली.

    त्यानुसार आरोपींकडून बारामती तालुका पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेला एक महीन्द्रा कंपनीचा अर्जुन (५५५) टॅक्टर, तसेच बारामती शहर ,भिगवण,जेजुरी परीसरातुन चोरीस गेलेल्या एक होन्डा शाईन,तीन स्प्लेंन्डर,एक डिलक्स,एक टि.व्ही.एस व्हिक्टर,एक पॅशन अशा एकुण ७ मोटार सायकली, दोन क्राॅस कंपनीचे रेंजर सायकल,तसेच विहीरीतील विजपंपाची २०० मीटर केबल असा एकुण ८लाख २०हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांनी दिली.

    सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डाॅ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस काॅन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, शंशिकांत दळवी,होमगार्ड सिघ्दार्थ टिंगरे,ओंकार जाधव यांनी केली आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article