
बारामती; लाट्यात ११२ जणांची कोरोना चाचणी: ७ जण पॉझिटिव्ह
Wednesday, May 12, 2021
Edit
कोऱ्हाळे बु- बारामती तालुक्यातील लाटे गावामध्ये आज ११२ कोविड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या यातील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. कॅम्पला प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, सभापती नीता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे आदींनी भेट देऊन लाटे गाव हाय अलर्ट असल्याने कोरोना उपाययोजना संदर्भात उपस्थित गावच्या कोरोना प्रतिबंधात्मक समितीला सूचना दिल्या.
कोरोना कॅम्प पार पाडण्यासाठी सोमेश्वरचे संचालक सचिन खलाटे, नानासाहेब खलाटे, अनिल खलाटे, सरपंच शीतल खलाटे, उपसरपंच, ग्रामसेवक विजय चव्हाण आदींनी प्रयत्न केले.
सापडलेले रुग्ण खालीलप्रमाणे
लाटे 3
माळवाडी 1
कुरणेवाडी 2
म्हसोबाचीवाडी 1
बजरंगवाडीतील किराणा दुकानदारांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने कोरोना रुग्ण वाढ होत असल्याचे बोलले जात आहे