-->
बारामती: सांगवीत सासरच्या दारातच विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार! छळ करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याने मृत्यू? नातेवाईकांना संशय.......

बारामती: सांगवीत सासरच्या दारातच विवाहित महिलेवर अंत्यसंस्कार! छळ करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याने मृत्यू? नातेवाईकांना संशय.......

कोऱ्हाळे बु - बारामती तालुक्यातील सांगवी येथील विवाहितेचा ससून रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर, तिचा मृतदेह आज दुपारी साडेबारा वाजता ससून रुग्णालयातून घेऊन विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी सांगवी येथे तिच्या सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार केले. 
          पती, सासू, नणंद, सासरे यांनी शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त करत तिचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोर केला.  सांगवी येथील गीतांजली अभिषेक तावरे या विवाहितेवर बारामतीतील खासगी दवाखान्यात व तिथून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. विषारी औषध पोटात गेल्याने तिच्यावरती उपचार सुरू होते. काल तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
          या मृत्युनंतर गीतांजलीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर खून केल्याचा आरोप करत तिच्या मृतदेहावर सांगवी येथील सासरच्या घरासमोर आज अंत्यसंस्कार केले. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुरसाळे (तालुका माळशिरस) येथील सुनील यादव यांची कन्या गीतांजली व सांगवी येथील वसंतराव तावरे यांचा मुलगा अभिषेक याचा विवाह 24 मे 2020 रोजी सांगवी येथे पार पडला होता. तिचा 50 तोळे सोन्याचे दागिने आणण्यासाठी वेळोवेळी छळ होत होता असा आरोप गीतांजलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी करून गीतांजली हिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. 
          हे विषारी औषध सासू, पती, सासरे यांनीच पाजले असल्याचा आरोप गीतांजलीच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान आज या अंत्यसंस्कारप्रसंगी बारामती तालुका पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त ठेवला होता. येथील वातावरण तणावपूर्ण होते. माहेरच्या मंडळांनी मंडळींनी कोणाचेही न ऐकता सासरच्या घरासमोर गीतांजली हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान याप्रकरणी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article