
मोठी बातमी; निरा शहरात १८ ते २५ मे दरम्यान कडक लॉकडाऊन
Saturday, May 15, 2021
Edit
निरा- पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत व बाजारपेठ असलेल्या निरा शहरात 18 मे ते 25 मे दरम्यान जनता कर्फ्यु असणार असल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली.
आज रोजी निरा ग्रामपंचायतीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत कडक लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला.
निरा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूदरही वाढत आहे याचा अतिरिक्त ताण आरोग्य यंत्रणेवर येत आहे. निरा शहराला लागून असलेल्या अनेक गावांत देखील हीच परिस्थिती आहे.
बारामती तालुक्यात व सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने येथील लोक निरा बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने जनता कर्फ्यु पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या लॉकडाऊनमध्ये दूध व्यावसायिकांना सकाळी ७ ते ९ दरम्यान दूध विक्री करण्यास परवानगी दिली आहे.