-->
बारामती: रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामतीतून पुण्याला हलवले

बारामती: रविराज तावरे यांना उपचारासाठी बारामतीतून पुण्याला हलवले

बारामती- राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांना आज बारामतीतून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या्ंच्यावरील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली असून पुण्यात काही दिवस त्यांच्यावर उपचार होतील असे सूत्रांनी सांगितले.
         आज दुपारी एक वाजता त्यांना पुण्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान संध्याकाळी सात -साडेसात वाजता राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावर हल्ला झाला.. आणि त्यांना तातडीने दवाखान्यात हलवल्यानंतर अगदी क्षणाक्षणाला बारामतीतील डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता.. दाखवलेले प्रसंगावधान व प्रत्येक गोष्टीचा दूरदृष्टीने घेतलेला निर्णय यामुळे अत्यंत क्लिष्ठ व गंभीर असलेला प्रसंग अगदी निभावून गेला. रविराज तावरे यांच्यावरील उपचारात बारामतीच्या व पुण्याच्या डॉक्टरांची अक्षरशः कसोटी लागली. या क्षणाक्षणाची माहिती आज बारामती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख निती महाडिक यांनी दिली, अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आणि बारामतीच्या डॉक्टरांमधील संवेदनशीलताही सर्वांच्या समोर आली.

आज तावरे यांना पुण्याला हलविल्यानंतर डॉ. महाडिक यांनी या सर्व प्रसंगाचा ऑंखो देखा हाल सांगितला. रविराज तावरे यांच्यावर संध्याकाळी माळेगावातील संभाजीनगर भागात गोळीबार झाला. त्यानंतर लागलीच तेथील दादा जराड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तावरे यांना बारामतीत उपचारासाठी हलवले. त्यांना बारामती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर क्षणाक्षणाला युध्दाचा प्रसंग असल्याप्रमाणे तेथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी हालचाली केल्या. बारामती हॉस्पिटलमध्ये रुग्णालयाच्या संचालकांच्या मदतीने डॉ. भास्कर जेधे, डॉ. अमर पवार व त्या्ंच्या सहकाऱ्यांनी वेगवान हालचाली केल्या आणि अतिदक्षता तज्ञ डॉ. निती महाडिक यांनी तातडीने उपचारास सुरवात केली. अतिदक्षता विभागात घेतल्यानंतर रविराज तावरे हे बेशुध्द झाले. अति रक्तस्त्राव झाला, रक्ताच्या आठ ते दहा बाटल्या भरून रुग्णाचे ह़दयाचे ठोके नियमित केले. रक्तदाब नियमित केला. फुफ्फुस कार्यरत करून व्हेंटीलेटरवर रुग्णाची व्यवस्था केली. गोळी शरीरातच होती. त्या परिस्थितीत सिटी स्कॅन झाल्यानंतर गोळी फुफ्फुसाच्या बाहेरील बाजूला अडकल्याचे दिसून आले. ती गोळी काढण्यासाठी हृदयशस्त्रक्रिया तज्ज्ञ व त्यातही फुफ्फुसाशी संबंधित शल्यचिकित्सकही गरजेचे होते. शिवाय अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सुसज्ज व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर गिरीराज हॉस्पिटलमध्ये असल्याने रविराज तावरे यांना तेथे शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. गिरीराज हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉ. रमेश भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील सर्व व्यवस्था तत्परतेने तयार झाली.
 
          इकडे डॉ. भास्कर जेधे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुण्यातील शल्यचिकित्सक डॉ. सूरज चव्हाण यांना तातडीने संपर्क साधून त्यांना लागलीच पुण्याहून बोलावण्यात आले. डॉ. रमेश भोईटे यांच्याशीही संपर्क साधून त्यांना पुढील कार्यवाहीची माहिती देण्यात आली. यानंतर पुण्यातून निघालेले तज्ज्ञांचे पथक बारामतीत पोचण्याची खात्री मिळाल्यानंतर बारामती हॉस्पिटलमधून रात्री उशीरा रविराज तावरे यांना गिरीराज हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. येथून डॉ. निती महाडिक यांच्यासह तेथील आरोग्य पथक रुग्णवाहिकेतून गिरीराज हॉस्पिटलमध्ये आले. डॉ. सूरज चव्हाण, डॉ. निती महाडिक, गिरीराज हॉस्पिटलमधील आरोग्य कर्मचारी वर्ग, डॉ. अमर पवार, डॉ. संजय पुरंदरे, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष घालमे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर गिरीराज हॉस्पिटलमध्ये रिकव्हरी रुममध्ये पुढील विश्रांतीसाठी ठेवण्यात आले. तेथेच तेथे देखरेख करण्यात आली. मात्र पुढील उपचारात रुग्णास कोणताही अतिरिक्त संसर्ग होऊ नये, फुफ्फुस तज्ज्ञांची देखरेख राहावी यासाठी तावरे यांना पुण्याला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article