
बारामती: अल्पवयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेल्याने एकविरोधात वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
Friday, June 25, 2021
Edit
मोरगाव : लोणी भापकर ता. बारामती येथील एका अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेहण्याचा प्रकार नुकताच घडला आहे . याप्रकरणी मुढाळे येथील महादेव लाला खोमणे याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
मुळची लोणी भापकर ता. बारामती जि. पुणे येथील एका पंधरा वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी सध्या दौंड तालुक्यातील भांडगाव येथे आपल्या आईसोबत राहत होती. या अल्पावयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेहला असल्याचा प्रकार घड्ला आहे. संबंधीत मुलीला महादेव लाला खोमणे रा मुढाळे ता. बारामती जि पुणे याने पळवून नेहले असल्याने या संदर्भात मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीनुसार आरोपी महादेव खोमणे या विरोधात कलम ३६३, अनुसूचित जाती जमाती सुधारणा अधीनियम २०१५ कलम ३ (2)(व्हीए ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर करीत आहेत