
बारामती: मारहाण करून खिशातील पैशे लुटणारे ३ आरोपी जेरबंद बारामती शहर पोलीस स्टेशनची कामगीरी
Saturday, July 10, 2021
Edit
बारामती:- शहर पोलीस स्टेशन हददीत मौजे शिवरत्न पेट्रोलपंप जवळ स्पेशल चाय या चहाचे टपरी जवळ तीन अज्ञात चोरटयांनी एका इसमास जबर मारहाण करून त्याचे पॅन्टचे खिशातील १८५००/- रूपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावुन घेवुन जबरी चोरी करून पळुन गेले बाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला दि.३०/०६/२०२१ राजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रमाणे गुन्हयातील गेले मालाचा व अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने चालू केला.
सि.सि.टी.व्ही फुटेज तसेच गुप्त माहितीदार यांचे मार्फत यातील आरोपी नामे १)पिण्या उर्फ अमर सुनिल सोनवणे रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे २)अशुतोष सुरेश भिसे रा.सुहासनगर आमराई बारामती जि.पुणे ३ )कृष्णा सुर्यकांत कुभार रा.सुहासनगर आमराई बारामती जि पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे विचारपुस चौकशी केली असता यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांचेकडून तपासादरम्यान ३०००/- रूपये रोख रक्कम असा मुददेमाल हस्तगत करून गुन्हयाचे पुरावे कामी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.पालीस अधिक्षक श्री अभिनव देशमुख,मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री मिलीद मोहिते सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर सो, पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, महिला साहायक पालीस निरीक्षक अश्वीनी शेंडगे, सहायक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रूपेश साळुके, सागर देशमाने, पो.कॉँ.सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी केली.