-->
बारामती: ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला, जे अजूनही थांबायला तयार नाही ते पवार साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बारामती: ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला, जे अजूनही थांबायला तयार नाही ते पवार साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बारामती : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत.
       बारामती इंक्युबेशन इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन (Baramati Incubation Innovation Center) प्रसंगी ते बोलत होते पवारांसारखा तरणाबांड नेता ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला, जे अजूनही थांबायला तयार नाही पवार साहेब महाराष्ट्र चं नेतृत्व करत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

मुख्यमंत्री म्हणाले ' मला यायला अडचण होती, काय अडचण होती तेही सांगून ठेवतो माझे पाय धरले होते. कोणी पाय धरावेत इतका मी काही मोठा नाही, उभा राहिलो तरी कधीच डगमगत नाही, तसेच संस्था ही तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. पंखाना भरारी देण्याच काम या संस्था करतात. जिद्द पाहिजे, बदल घडू शकतो. राजकारणामध्ये देखील राजकारणात ही इंक्युबेशन सेंटर असावं, आम्ही 25 ते 30 वर्षांपूर्वी इंक्युबेशन केलं आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तसेचआम्ही आमच कर्तव्य केलं असल्याचेही ते म्हणाले.

पवार साहेबांनी दगडाला पाझर फोडला -

तसेच आजचा हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. देशातील मोठ्या सेंटरवरती माझ नावं आहे. तसेच या कामात माझा काही हातभार नाही फक्त बटन दाबण्यापुरता माझा हातभार असल्याचही ठाकरे म्हणाले.तसेच पवार साहेबांनी दगडाला देखील पाझर फोडून दाखवला असही ते यावेळी म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमास रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, सकाळ माध्यम समूहाचे प्रतापराव पवार कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article