-->
Baramati Bank:  राष्ट्रवादीच्या सहकार प्रगती पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध

Baramati Bank: राष्ट्रवादीच्या सहकार प्रगती पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध

बारामती सहकारी बँकेची निवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. दुपारपर्यंत राष्ट्रवादीपुरस्कृत पॅनलचे तेरा उमेदवार वगळता तीन उमेदवारी अर्ज मागे राहिल्यामुळे बँकेची निवडणूक होणार असे चित्र होते. मात्र संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. डॉ. विजयकुमार भिसे यांनी आपले तीनही अर्ज मागे घेतले आहेत.
बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीपुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे तेरा उमेदवार वगळता अन्य तीन अर्ज राहिले होते. त्यामुळे निवडणूक होणार असेच चित्र पाहायला मिळत होते. परंतु राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संध्याकाळी उशीरापर्यंत प्रयत्न करत ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले आहे.

संध्याकाळी उशीरा डॉ. विजयकुमार भिसे यांनी आपले अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग आणि खुल्या प्रवर्गातील दोन उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर त्यांच्या कन्या प्रतीक्षा भिसे यांचा महिला प्रवर्गातून दाखल करण्यात आलेला अर्जही मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.   

बारामती सहकारी बँकेच्या बिनविरोध संचालकांची नावे पुढीलप्रमाणे :  

सर्वसाधारण मतदार प्रवर्ग : सचिन सदाशिव सातव, मंदार श्रीकांत सिकची, रणजित वसंतराव धुमाळ, जयंत विनायकराव किकले, नुपुर आदेश वडूजकर, देवेंद्र रामचंद्र शिर्के, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, किशोर शंकर मेहता, ॲड. शिरीष दत्तात्रय कुलकर्णी, नामदेवराव निवृत्ती तुपे

महिला राखीव प्रवर्ग : कल्पना प्रदीप शिंदे, वंदना उमेश पोतेकर

भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग : उद्धव सोपानराव गावडे

इतर मागास प्रवर्ग : रोहित वसंतराव घनवट

अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : विजय प्रभाकर गालिंदे

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article