
राज्यात बैलगाडा शर्यतीला पुन्हा ब्रेक.....?
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळरावपाटलांनी (Shivaji Adhalrao-Patil) तर तळेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने 1 जानेवारी 202 ला नवीन वर्षांच्या पहिल्याच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. या शर्यतीसाठी लाखो रुपयांची बक्षीसेही जाहिर करण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, बैलगाडा घाट शर्यतीसाठी सज्ज झाले आहेत. मात्र आज मध्यरात्रीपासून राज्यसरकारकडून कोरोना विषाणू आणि ओमिक्रॉनचा वाढता संभाव्य धोका लक्षात घेता राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांंवर कडक निर्बंध लागू करत लग्न समारंभ, अंत्यसंस्कार यावर संख्येवरही निर्बंध लागू करण्यात आहे..!
सात वर्षाच्या प्रतिक्षेनंतर बैलगाडा घाट गर्दीने फुलुन भंडाराची उधळण करत वाजत गाजत भिर्रर्रर्र....र्र...ची शर्यत भरणार होती. मात्र कोरेनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा बैलगाडा शर्यतीला ब्रेक लागणार असल्याने बैलगाडा मालक चालकांमध्ये, शौकिनांनी आता नाराजीचा सुर आळवला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालायाने बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी दिल्या नंतर महाराष्ट्र सर्व प्रथम बैलगाडा शर्यत लांडेवाडीत उद्या खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांच्या नेतृत्त्वात आयोजित करण्यात आली आहे. या बैलगाडा शर्यतीसाठी येणाऱ्या बैलगाडा मालकांना टोकण नंबर घेणे बंधनकारक केले होते. त्या निमित्ताने गुरुवारी तब्बल 703 बैलगाडा मालकांनी टोकण घेत नोंदणी केली. गुरुवारी सकाळपासूनच टोकण घेण्यासाठी मोठया संख्येने बैलगाडा मालक जमले होते. संपूर्ण गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. मात्र कोरोना निर्बंधांमुळे आता या शर्यतीलाही ग्रहण लागणार असल्याचे दिसत आहे.