
ग्रामीण भागात हुरडा पार्ट्यांना रंगत
Thursday, December 30, 2021
Edit
बारामती : करोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनंतर आता ग्रामीण परिसरात हुरडा पाटर्य़ा सुरू झाल्या आहेत. सरत्या वर्षांच्या स्वागतासाठी वर्षांच्या अखेरच्या दिवसांत सध्या बारामती तालुक्यासह इतरही भागांत हुरडा पाटर्य़ांना रंगत येत आहे.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चांगल्या प्रकारे थंडी असते. ऐन थंङीतच हुरडा खाण्याची मजा ही आगळी-वेगळीच असते. ज्वारीच्या कच्च्या कणसातील हिरवेगार दाणे शेकोटीवर भाजून ते दही, शेंगा-लसूण चटणीसोबत खाण्याची मजा वेगळीच असते. त्या सोबत जर भाजी, ज्वारीची भाकरी, गूळ, बाजरीची भाकरी, खोबरं, चटणी, हरभरा, लोणचे, उसाचा रस असा जर बहुरंगी बेत ठरला तर हुरडा पार्टीची रंगत अधिकच वाढते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हुरडा पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. त्याला शहरी भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या पाटर्य़ांबाबत शहरी भागात जाहिरातीही केल्या जातात. कुटुंब, मित्र-मैत्रिणी किंवा कार्यालयातील सहकारम्य़ांसोबत अशा पाटर्य़ांमध्ये सहभाग घेतला जात आहे. नव्या वर्षांच्या स्वागताला या पाटर्य़ांना चांगली मागणी असते. प्रत्यक्ष पार्टीला न येणारम्य़ांना घरपोच सेवाही दिली जाते. हुरडय़ासह ग्रामीण जेवण आणि इतर पदार्थांसह माणशी पाचशे रुपयांपर्यंत आकारणी केली जाते.