-->
ऊसतोड मजुरांच्या कोपीवर चोरट्यांचा डल्ला

ऊसतोड मजुरांच्या कोपीवर चोरट्यांचा डल्ला

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड मजूरांच्या कुतवळवाडी येथे असलेल्या झोपडीवर चोरट्यांनी भरदिवसा चोरी करून मजूरांचे सर्व धान्य कपडे चोरून नेले सर्व ऊसतोड मजूर हे फडात ऊस तोडण्यासाठी गेले असता दुपारी चोरट्यांनी सर्व साहित्य चोरून नेले ऊसतोड मजूर संध्याकाळी घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आले सर्व कपडे धान्य चोरीला गेल्यामुळे हे सर्व ऊसतोड मजूर उघड्यावर पडले होते ही गोष्ट सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणेश चांदगुडे यांना कळताच त्यानी आज तातडीने या मजूरासाठी पन्नास कीलो तांदूळ पन्नास कीलो गहू तसेच पन्नास कीलो साखर तसेच थंडीसाठी लागणारे ऊबदार बॅंकेट उपलब्ध करून दिले यावेळी सर्व ऊसतोड मजूर यांचा आंनद गगणात मावेनासा झाला होता यावेळी बोरकरवाडीचे पोलिस पाटील राहूल बोरकर सचिन पवार, राजकुमार लव्हे,सूरज शिंदे तसेच खैरे वाबळे,पायोळे, खोमणे, मोरे, शिंदे, जगताप हे सर्व कारखान्याचे शेतकी कर्मचारी उपस्थित होते.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article