-->
Big Breaking : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना पराभूत करत भाजपाचे प्रदीप कंद यांचा विजयी

Big Breaking : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीला धक्का; राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना पराभूत करत भाजपाचे प्रदीप कंद यांचा विजयी

राष्ट्रवादी काॅंग्रेसला पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. 
      गद्दारांना पराभूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.

      मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना पराभूत केले आहे. कंद यांना 405 तर घुले यांना 391 मते पडली.

     या बॅंकेवर राष्ट्रवादीच वर्चस्व असले तरी कंद यांच्या रूपाने भाजपला एक अधिकृत जागा मिळाली आहे. दुसरीकडे तालुकास्तरीय अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार अशोक पवार (शिरुर), सुनील चांदेरे (मुळशी) आणि अपक्ष विकास दांगट (हवेली) यांनी माजी मारली आहे.

      बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे आणि प्रकाश म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. या तीनही मतदारसंघात मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिली आहे.
हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि बॅंकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के आणि राष्ट्रवादीचेच विकास दांगट यांच्यात मैत्रीपूर्ण लढत झाली. या लढतीत दांगट यांनी सुमारे १५ मतांनी विजय मिळवला आहे. म्हस्के यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दांगट यांना ७३ तर, म्हस्के यांना ५८ मते मिळाली आहेत.

        शिरूरचे आमदार अशोक पवार हे ८६ मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना १३२ पैकी १०९ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार आबासाहेब गव्हाणे यांना २३ मते मिळाली आहेत.
       मुळशी तालुका मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सुनील चांदेरे विजयी झाले आहेत. त्यांनी बॅंकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांचा पराभव केला आहे. येथील एकूण ४५ मतांपैकी चांदेरे यांना २८ तर, कलाटे यांना १७ मते मिळाली आहेत.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article