-->
आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी परीक्षा पेपरफुटीची पाळेमुळे बारामतीपर्यंत; बारामती तालुक्यातील तरडोली येथील एकाचा समावेश

आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी परीक्षा पेपरफुटीची पाळेमुळे बारामतीपर्यंत; बारामती तालुक्यातील तरडोली येथील एकाचा समावेश

पुणे :  आरोग्य, म्हाडा व टीईटी  परीकक्षेच्या  पेपर गैरव्यव्हाराची सुत्रे बारामती तालुक्यापर्यंत पोहचली आहेत. बारामती मोरगाव नजीक तरडोली  येथील निखील वसंत कदम याचा या  प्रकरणामध्ये  समावेश आहे.  त्याला न्यायालयात  काल  दि २ रोजी हजर  केले  असुन  ४ जानेवरी पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहेत.
 म्हाडा, आरोग्य, टी.ई. टी. पेपर फुटीची चर्चा  संपुर्ण राज्याच चांगली चर्चीली जात आहे. जी. ए. स्फॉटवेअरचा संस्थापक  गणेशन  हा पेपरफुटी प्रकरणी   सायबर पोलीसांनी  नोटीस बजाबली आहे.  तर   डॉ. प्रितीश  देशमुख , आश्विनकुमार यांना  अटक करण्यात आले आहे.  या पेपर फुटीचे प्रकरणाची पाळेमुळे  बारामती तालुक्यापर्यंत येऊन पोहचले.

 या गुन्हामध्ये सहभागी असलेला निखिल वसंत कदम हा बारामती तालुक्यातील मोरगाव नजीक तरडोली येथील मुळचा तर सध्या  पुणे येथिल काळेवाडीचा राहणारा आहे. निखिल याच्यासहीत  आश्विनकुमार  शिवकुमार, सौरभ महेश त्रीपाठी याला   वरीष्ठ पोलिस  निरीक्षक  अजय वाघमारे यांनी काल अटक करुन काल दि २ रोजी   न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यांना उद्या दि  ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . बारामती तालुक्यातील निखील याच्याकडील मोबाईलमध्ये  आश्विनकुमार याला पाठविलेले ईमेल  प्राप्त झाले आहेत . तसेच ५६  विद्यार्थ्यांची यादी प्राप्त झाली आहे. तर  प्रत्येकी ४० हजार रुपये दिले असल्याचे नमूद  केले आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article