
बारामती तालुक्यातील ८०% पेक्षा कमी वसूल असणाऱ्या व अनिष्ठ तफावत असणाऱ्या संस्थांची आढावा बैठक संपन्न
Wednesday, February 9, 2022
Edit
बारामती : तालुक्यातील सन 2021-22 या आर्थिक हंगामातील 80% कमी वसूल असणाऱ्या संस्थांची व NPA व अनिष्ठ तफावत वसुली आढावा सभा घेण्यात आली. सभेस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबळे, बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर, दत्तात्रय येळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण साहेब, सह्ययक निबंधक मिलिंद टांकसाळे, उपसरव्यवस्थापक इंगळे साहेब, काटे साहेब उपस्थित होते.
यावेळी बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालकांचा बँकेच्या व संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सभेचे मुद्दे
थकीत सभासदांची १०१,१ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रकरणे दाखल करणे
तसेच संस्था बँकपातळी एनपीए १०० टक्के वसूल करणे या बाबत सविस्तर आढावा बैठक घेणे
वसुलीची कारवाई जलद गतीने राबवण्यासाठी वसुली अधिकारी यांना सूचना देणे
आदी विषयावर या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली.