
संत सेवालाल महाराज यांना प्रशासनातर्फे अभिवादन
Wednesday, February 16, 2022
Edit
बारामती दि.16 :- संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासनातर्फे त्यांना दि.15/2/2022 रोजी अभिवादन करण्यात आले.
तहसिल कार्यालय, बारामती येथे संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार डॅा.भक्ती सरवदे- देवकाते तसेच उपविभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय व उपमाहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.