
ग्राम सुरक्षा दलाला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते किट वाटप ग्राम सुरक्षा दलामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत- उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : ग्राम सुरक्षा दलाच्या निर्मितीमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होईल आणि ग्राम सुरक्षा दलाची यात्रा, नैसर्गिक आपत्ती इत्यादी ठिकाणी मदत घेता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने ग्रामसुरक्षा दल स्थापना व किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दिपक चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, वाड्या वस्त्यांवर पडणारे दरोडे यावर नियंत्रण बसेल. गावात गस्त घालणे, स्थानिक सुरक्षा इत्यादी कामे ग्राम सुरक्षा दलाकडून करून घेता येतील. ग्राम सुरक्षा दलाने चांगल्याप्रकारे काम करून पोलिसांना मदत करावी. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नागरीकरणामुळे पोलीस दलात मनुष्यबळ कमी पडत आहे. पोलिस दलातील मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल.