
चोपडज संस्थेच्या निवडणुकीत गाव पॅनेलचा दणदणीत विजय
Saturday, April 16, 2022
Edit
वडगाव निंबाळकर:- बारामती तालुक्यातील चोपडज येथील विविध कार्यकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री सटवाई माता गावकरी पॅनलने १३ ही जागा जिंकत सत्ताधारी श्री सटवाई माता कृषी विकास पॅनलचा धुरळा केला.
१३ जागांकरिता चुरशीच्या वातावरणात हनुमान जयंती दिनी मतदान पार पडले. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना एकही जागा जिंकता आली नाही. गावकरी पॅनेल विजयी झाल्याने सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांची पॅनल प्रमुखांचे आभार मानले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे
गणेश गाडेकर, राजेंद्र गाडेकर, रामदास गाडेकर, संजय गाडेकर, दत्तात्रय गायकवाड, विजय निंबाळकर, बाबासो पवार, पंढरीनाथ साळुंखे, चंद्रकला गाडेकर, सुशीला दरवेशी, दशरथ यादव, अनिल गायकवाड, युवराज विरकर