-->
भैरवनाथ सहकारी सोसायटीवर भैरवनाथ परीवर्तन पॅनलवर निर्विवाद वर्चस्व

भैरवनाथ सहकारी सोसायटीवर भैरवनाथ परीवर्तन पॅनलवर निर्विवाद वर्चस्व

मोरगाव : तरडोली ता. बारामती येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षीक निवडणूक संपन्न झाली. भैरवनाथ सहकार विकास पॅनल विरूध्द भैरवनाथ परीवर्तन  पॅनल मध्ये झालेल्या लढतीत माजी सरपंच नवनाथ जगदाळे व  विद्यमान उपसरपंच महेंद्र तांबे यांच्या  भैरवनाथ परीवर्तन  पॅनलने  सर्व १३ जागा जिंकून विरोधकांचे पानीपत  केले.
        काल दि १० रोजी श्री भैरवनाथ विविध विकास सह सोसायटीच्या १३ जागांची  निवडणूक झाली. या निवडणूकीमध्ये  गत पंचवार्षीक निवडणूकीमध्ये बिनविरोध निवडून आलेले संचालक दोन गटात विभागले गेले होते.   आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत काल  अटी तटीच्या झालेल्या लढतीत सर्वसाधारण प्रवर्गामध्ये रमेश कांतीलाल गाडे, विनायक सोपाना गाडे, अशोक निवृत्ती पवार, फुलचंद नानासो पवार, यशवंत शंकर भापकर, वसंत विठ्ठल भापकर, शारदा बाळकृष्ण भापकर, गौरी विनोद भोसले, महीला प्रतीनिधी मधून बेबी गफूरबाई तांबोळी,  प्रियंका सोमनाथ भापकर, इतर मागास प्रवर्गातुन नवनाथ जगन्नाथ जाधव, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातुन रवींद्र गुलाब साळवे, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातुन किसन हरीबा धायगुडे  हे निवडून आले.

         माजी सरपंच  नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, माजी सरपंच रामचंद्र भोसले, दत्तात्रय तांबे, मा. सभापती भाऊसाहेब कांबळे,  संजय भापकर यांनी विजयी उमेदवारांचे स्वागत केले. विजयी उमेदवारांनी संचालक पदी निवड झाल्यानंतर बोलताना सांगितले की, हा विजय प्रत्येक सभासद शेतकऱ्यांचा आहे. सोसायटी मार्फत प्रत्येक शेतकरी सभासदास समान न्याय पद्धतीने  कर्जवाटप केले जाणार असून जास्तीत जास्त विश्वासार्ह कारभार केला जाणार आहे.

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article