पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनिल वडघुले, सरचिटणीसपदी मारुती बाणेवार उपाध्यक्षपदी तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के
पिंपरी: मराठी पत्रकार परिषद संलग्न व पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली. ही कार्यकारिणी पुढील दोन वर्ष कार्यान्वित राहणार आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष तुळशीदास शिंदे, प्रवीण शिर्के, सरचिटणीस मारुती बाणेवार, सहचिटणीस संजय बोरा, खजिनदार विनय लोंढे, समन्वयक विनायक गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुनील कांबळे, माधुरी कोराड, दिनेश दुधाळे तसेच पत्रकार हल्ला कृती समिती पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनिल भालेराव आणि पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी दादाराव आढाव यांची निवड करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कै. भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात गुरुवारी (दि. 21) आयोजित केलेल्या बैठकीस पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, गणेश हुंबे, माजी अध्यक्षा सायली कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अरुण उर्फ नाना कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.