-->
जातीधर्माच्या पलीकडले बापू.....

जातीधर्माच्या पलीकडले बापू.....

     आज काल गल्लीपासून दिल्लीपर्यंत जातीचे राजकारण चालले असल्याचे दिसत आहे. राजकारण करत असताना सोयीस्कररित्या स्वजातीच्या लोकांना झुकते माप देण्याचा प्रयत्न राजकारणी करत असतात. असे असले तरी सर्वच राजकारणी असेच असतात असे मी म्हणणार नाही. ज्याप्रमाणे रणरणत्या वाळवंटात कुठेतरी पालवी असते त्याप्रमाणे राजकारणात ही काही अशी वेगळी व आल्हाददायक  उदाहरणे असतात जी लक्ष वेधून घेत असतात. आपल्या गावातही असेच एक उदाहरण आहे ते म्हणजे बारामती पंचायत समितीचे गटनेते प्रदीप धापटे. त्यांना कुणी आदराने बापू म्हणतात तर कुणी बापूनाना.
    बापू प्रचंड क्रिकेटप्रेमी आहेत. अलीकडच्या काळात त्यांना त्यांच्या उद्योगामुळे क्रिकेट खेळता आले नाही मात्र साधारण वीस वर्षांपूर्वी आम्ही लहान असताना बापू उत्तम क्रिकेट खेळायचे. समोर कितीही वेगवान गोलंदाज असला तरी बापू त्याला लीलया ऑफ साईडच्या दिशेला फटकावत असत. मुलांना क्रिकेटचे साहित्य आणून देणे, बाहेर गावी स्पर्धा असल्यास त्या स्पर्धेची प्रवेश फी भरणे, मुलांना स्पर्धेला नेण्याची त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था सर्व बापू करत. बापूंमुळे त्याकाळी क्रिकेट आपल्या गावात रुजली. 
  नंतरच्या काळात मात्र बापूंनी जैन ठिबकच्या व्यवसायात झोकून दिले. त्यांच्या प्रचंड जनसंपर्क, दर्जेदार काम , पारदर्शक व्यवहार व छक्के पंजे नसलेला सरळमार्गी स्वभाव या गुणांमुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला.तालुक्यात त्यांचं नाव झाल. हे करत असताना त्यांनी त्यांचा मूळ मात्र कधीच बदलला नाही सहकार्याचा, समाजकारणाचा.. गावात कुणाला कशाचीही गरज पडो त्याने सरळ उठावं व बापूंकडे जावं. बापू फुल ना फुलांची पाकळी मदत करणारच. बरं केलेली आर्थिक मदत परत करावी ही त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही. या मदतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बापूंनी कधी ही गट तट, जात, पॅनेल बघून मदत केली नाही. म्हणतात ना एका हाताने केलेली मदत दुसऱ्या हाताला कळू नये अशी मदत बापू करत होते व आज ही करत आहेत. त्यांना कधी ही गावच राजकारण करायचं नव्हतं. मात्र असं असतानाही ही त्यांनी मदतीचा हात कधी ही आखडता घेतला नाही. माझ्या दलितवस्तीतील अंकुश असेल, मंगेश असेल अशा अनेक जणांना बापूंनी नेहमी मदतीचा निस्वार्थी हात दिला आहे. 
आज कालचे राजकीय नेते एक झाड जरी लावले तरी सोशल मीडियावर त्याचे शंभर फोटो अपलोड करून स्वतःची पाठ स्वतःच किंवा भाडोत्री कार्यकर्त्यांकडून थोपटून घेत असतात मात्र दुसरीकडे बापू राकरणातील कोणतेही पद नसताना गेली अनेक वर्षे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात ते ही कोणताही गाजावाजा अथवा शो शायनिंग न करता. त्यांच्या कामाची दखल घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना पंचायत समितीचे तिकीट दिले. बापू सहज निवडून आले. त्यांची क्षमता ओळखून दादांनी त्यांना गटनेतेपदाची जबाबदारी दिली. बापूंनी आपल्या कार्याने अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमटलेला आहे. रक्तदान शिबीर, कीर्तन असे उपक्रम म्हणजे समाजाचे, मतदारांचे ऋण फेडणे नव्हे का. 
जेव्हा आपण दिवाळी साजरी करण्यात व्यस्त होतो तेव्हा बापू आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावरील खड्डे बुजवत होते. बापू कधी ही नेत्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी पुढे पुढे मिरवत नाहीत तर जनतेत मिसळतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. शासकीय योजना जास्तीत जास्त तळागाळातील उपेक्षित लोकांपर्यंत पोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यामुळे दलित, मुस्लिम, ओबीसी, मराठा य सर्वच जातींना बापू आपलेसे वाटतात त्यामुळे भविष्यात बापूंना मोठी पक्षीय जबाबदारी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. बापूंना त्यांच्या वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा...
     हेमंत गडकरी



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article