शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी? शरद पवार दिलेला शब्द पाळणार?
Wednesday, November 27, 2019
Edit
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे विधान राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्ता मेळावा जालना येथे केले होते.
महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्यामुळे शपथविधी पार पडल्यानंतर सरसकट कर्जमाफी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संकटात सापडला आहे आता हेच पाहण्याचे औचित्याचे ठरणार आहे की, शरद पवार दिलेला शब्द पाळणार का?