-->
सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती!

सत्तेचं सूत्र आता काका-पुतण्याच्याच हाती!

अजित पवार भाजपच्या बाजुने असून शरद पवारांचा कल महाविकास आघाडीकडे आहे. या दोघांच्याच निर्णयावर महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. आता हे दोघे काका-पुतणे गेम कोणाचा करणार भाजपचा की, शिवसेना-काँग्रेसचा असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


              मुंबई - काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक म्हणूनही राहणार नाही, अशा वल्गना करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली. जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत न देता सर्वांनाच धडा शिकवला. मात्र यातूनही शरद पवारांनी सुयोग्य चाली खेळत सर्व राजकारण आपल्या अवतीभोवती खेळतं ठेवल. त्यातच अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे यात आणखीच ट्विस्ट आला. मात्र राजकारणातील सध्याच्या हालचाली पवार काका-पुतण्याच्या इशाऱ्यावर तर चालत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


          विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात बसणार हे स्पष्ट झाले होते. मात्र शिवसेना-भाजपमधील मतभेद वाढल्यामुळेराष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी स्पेस निर्माण झाला. त्यानंतर पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावून महाविकास आघाडीची मेख रोवली. सर्वकाही निश्चित झालं. शिवसेना पक्ष एनडीएतून बाहेरही पडला. त्यामुळे महाआघाडीचं सरकार येणार हे स्पष्ट झाले होते. 


              दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होणार असं चित्र दिसत असताना अचानक अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला. त्यामुळे राज्यात मोठी उलथापालथ झाली. परंतु, पवारांनी आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचा दावा करत भाजपविरुद्ध दंड थोपटले. त्यामुळे या कथेत ट्विस्ट आला आहे. 


  



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article