-->
बारामती-फलटण महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

बारामती-फलटण महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

पाहुणेवाडी हद्दीत अपघातांची मालिका सुरूच


डोर्लेवाडी - बारामती-फलटण-लोणंद महामार्ग गेले अनेक वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला असून मार्गावर छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. त्यातच पाहुणेवाडी हद्दीत एकामागोमाग एक अपघात होत असल्याने येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.


ग्रामपंचायतीने दिला रास्ता रोकोचा इशारा
बारामती फलटण लोणंद या महामार्गावर वाहने वेगाने जा-ये करता यामुळे पाहुणेवाडी हद्दीत अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहेत. अनेकांना अपंगत्व आले आहे या दुर्घटना टाळण्यासाठी पाहुणेवाडी हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रिप्लेकटर आणि गतिरोधक बसवावेत.


अन्यथा रास्ता रोको करणार आहोत, असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शीतल बुरुंगले आणि उपसरपंच जयकुमार तावरे यांनी दिला आहे.


बारामती-फलटण-लोणंद महामार्गाचे रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, पाहुणेवाडी हद्दीत रस्ता गुळगुळीत असल्याने वाहने अतिशय वेगाने जा-ये करतात यामुळे रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव देखील गेलेले आहेत.


दरम्यान, नुकत्याच झालेल्या अपघातात युवराज ढवळे यांचा मृत्यू तर अमोल यादव यांना पाय गमवावा लागला आहे. याठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात वारंवार घडत आहेत. यामुळे पाहुणेवाडी हद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित गतिरोधक, रात्रीच्या वेळी चमकणारे रिप्लेकटर बसवावेत अशा मागणीचे पत्र पाहुणेवाडी ग्रामपंचायतीने बारामती सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिले आहे.


बारामती फलटण लोणंद या महामार्गावर गतिरोधक बसवण्याची अनेक जणांची मागणी आहे. या रस्त्यावर गावाच्या आणि अपघात ठिकाणी थर्माप्लास्टिकचे पांढरे पट्टे मारलेले आहेत काही ठिकाणी पांढरे पट्टे तसेच सेफ्टी साधने लावले जातील.


- विश्‍वास ओव्हाळ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम अधिकारी बारामती


 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article