-->
बारामतीत सापडले आणखी 2 कोरोनाग्रस्त, एकूण आकडा 4 वर

बारामतीत सापडले आणखी 2 कोरोनाग्रस्त, एकूण आकडा 4 वर

आज दिनांक 7/4 /2020 रोजी कोरोनाबाबत बारामती तालुक्याची अपडेट्स खालील प्रमाणे आहेत. काल समर्थ नगर मध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बारा व्यक्तीची तपासणी करण्यात आली त्यामध्ये रुग्णाची  सून  व मुलगा  या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. तरी सर्व बारामतीकरांना आव्हान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे अवाहन  प्रांताधिकारी
दादासाहेब कांबळे यांनी केले आहे. 


         बारामतीत पहिला रुग्ण 29/3 तारखेला सापडला होता तो रिक्षाचालक होता तर 6/4 तारखेला सापडलेला रुग्ण हा भाजीविक्रेता होता तर आज 7/4 तारखेला त्याच्याच बायको व मुलाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.


        काल कोरोना झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या 12 पैकी 9 जणांचे रिपोर्ट आले असून त्यातील 2 जण पॉझिटिव्ह आहेत तर अजून 3 जणांचे रिपोर्ट आलेले नाहीत. 


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article