2 गायी व 1 म्हैस चोरणाऱ्यांना वडगांव पोलिसांनी घेतले ताब्यात; 80 हजारांचा माल जप्त
कोऱ्हाळे बु- वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. 245/2020 व गु.र.नं. 250/220 भादवि 379 या दोन गुन्ह्यांत एकुण 80,000/- रु.किमतीच्या 2 गायी व 1 म्हैस चोरीस गेली होती.
सदर दोन्ही गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील आरोपी 1) अमर सोमनाथ चव्हाण वय 19 रा सुपे ता पुरंदर सध्या वडगाव निंबाळकर ता बारामती 2) सनी दत्तू जाधव वय 25 रा खांडद ता बारामती 3) प्रशांत राजेंद्र मदने रा वडगाव निंबाळकर ता बारामती 4) नासीर बाबूलाल कुरेशी वय 36 रा फलटण रोड बारामती ता बारामती 5) बंदेनवाज हसन शेख वय 36 रा मळद ता बारामती जि पुणे यांना अटक करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील 1)25000₹ ची म्हैस 2) 55000 ₹ 2 गाई असा एकूण 80000 ₹ चा माल जप्त करण्यात आला आहेत.
वरील कारवाई मा.पोलीस अधिक्षक मा.संदीप पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक बारामती मा.जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी मा.सपोनि एस व्ही लांडे व स्टाफने केली.