-->
शिरष्णे ; दारु समजून विषारी द्रव पिल्याने एकाचा मृत्यू

शिरष्णे ; दारु समजून विषारी द्रव पिल्याने एकाचा मृत्यू

बारामती :पुणे जिल्ह्यातील शिरष्णे (ता. बारामती) येथील दत्तात्रय सोपान वाघमारे (वय ४३) यांचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात दारु समजून येथील सुमारे सात ते आठजणांनी हे द्रव्य प्राशन केले होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिस प्रशासनाकडे यासंबंधीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.


दत्तात्रय वाघमारे हे शिरष्णे येथील महिला सरपंचांचे पती होते. त्यांच्यासह त्यांच्या अन्य मित्रांनी गेल्या चार दिवसांपूर्वी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटसारख्या विषारी द्रवाचे प्राशन केले होते. लॉकडाऊनच्या काळात दारु समजून ते प्राशन केल्याचे समजते. दरम्यान यातील वाघमारे यांचा रविवारी (दि.३)  उपचारादरम्यान बारामतीत मृत्यू झाला. अन्य लोकांवर बारामती व फलटणमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 



बारामती व फलटण तालुक्याच्या सीमेवरील जिंती (ता. फलटण) येथे दारु न मिळाल्याने सॅनिटायजर प्राशन केल्याने यापुर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार शिरष्णे येथील घटनेत झाला असल्याची परिसरामध्ये चर्चा आहे. दरम्यान पोलिस प्रशासन याबाबत अद्याप अनभिज्ञ आहे. वाघमारे यांच्या मृत्यूबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.


Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article