सोमेश्वर परिसरात सामाजिक संस्थेच्या सहाय्याने अनेक गरजवंतांना मदतीचा हात
पुणे ;- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतभर लाॅकडाऊन महीनाभर सुरू आहे. या काळात मात्र हातावर पोट असलेल्या मजुरांना मात्र अनेक समस्यांना सामोरं जावं लागतय. अशा परिस्थिती अनेक स्वयंसेवी संस्था या मजूरांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत आहेत.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर भागात असाच एक सकारात्मक प्रयत्न केला जातोय. परिसरातील तरूणांनी एकत्र येत 'सोमेश्वर नगर आपत्कालीन मदत ग्रुप' च्या मदतीनं मजूरांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतोय.
गहू, तांदूळ, कडधान्ये, डाळींच सोशल डिस्टंसिंग च पालन करत पॅकिंग केलं जात. आणि परिसरातील मजूरांच्या घरी जाऊन वाटप करण्यात येत. १७ मार्चला सुरवात केलेल्या या कामासाठी अनेक मदतीचे हातही जोडले जात आहेत.
या ग्रुपच्या माध्यमातून 516 मजूर कुटुंबाना आजतागायत या मदतीचा लाभ पोहचला आहे. लाॅकडाऊनच्या संपूर्ण काळात मदत करणार असल्याचं ग्रुपमधील तरुणांच म्हणणं आहे.