सोमेश्वरनगर; गाय चोरीप्रकरणी दोघांना अटक
कोऱ्हाळे बु||- वाघळवाडी ता बारामती येथील शेतकऱ्याची ५७ हजार रुपये किंमतीची गाय चोरून नेल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
शुभम दत्तात्रय जाधव व सुहास गोरख जाधव दोघे ही राहणार सोमेश्वरनगर ता बारामती अशी अटक केल्याल्यांची नावे आहेत. याबाबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यांच्याकडून ५७ हजार रुपये किंमतीची गाय हस्तगत करण्यात आली आहे.
वरील कारवाई पोलीस अधिक्षक संदीप पाटील , अप्पर पोलीस अधिक्षक बारामती जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि एस व्ही लांडे व पोलिस हवालदार महेंद्र फणसे ,पोलिस नाईक नितीन बोराङे , काशीनाथ नागराळे, सलमान खान, अक्षय सिताप, लोकरे, पोपट जाधव यांनी केले