
15 तारखेपासून बारामती लॉकडाऊन
Monday, July 13, 2020
Edit
आज आज बारामती नगरपरिषद हद्दीमध्ये 5 व्यक्तींना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे त्यामध्ये दोन पेशंट पूर्वीच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील आहेत.पांढरीचा महादेव,महादेव मळा व मारवाड पेठ येथे नवीन रुग्ण सापडले आहे. त्यामुळे त्या भागातील परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. त्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी मार्फत सर्वेक्षण होईल त्यात सर्वांनी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती.
त्याचप्रमाणे दिनांक 15/07/2020 च्या रात्री बारा वाजल्यापासून बारामती नगर परिषद हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक 16/07/2020 पासुन प्रतिबंध क्षेत्रांमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील इतर कोणतेही आस्थापना चालू राहणार नाही.