-->
बारामतीत कोरोनाची हातपाय पसरायला सुरुवात,  काल 3 तर 9 जणांना लागण

बारामतीत कोरोनाची हातपाय पसरायला सुरुवात, काल 3 तर 9 जणांना लागण

बारामती - बारामती शहरातील आणखी ९ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. काल शहरात सापडलेल्या रूग्णांच्या संपर्कातील ६ व्यक्ती पूर्ण बाधित झाले आहेत. तसेच ३ नवीन रुग्ण शरीरात आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील कोरोना बाधितांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बारामती हादरली आहे.


      शहरातील जळोजी ,वसंत्नगर पानगल्ली भागात (दि. ११) रोजी तीन नवीन रुग्ण सापडले होते. त्यांच्या संपर्कातील ६ जणांना कोरोनाची लागण झाली. तर इतर ३ नवीन रुग्ण कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले आहेत.


       लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यात कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धोकादायक ठरत असून बारामतीकरांची व प्रशासनाची चिंता वाढली आहे.



Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article