बारामती; आणखी 3 जण पॉझिटिव्ह
बारामतीत आजही तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, मात्र 62 जणांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह निघाल्याने बारामतीला तसा दिलासा मिळाला आहे, हे सर्वजण कोरोनाग्रस्तांच्या थेट संपर्कात असल्याने नागरिकांनी भीती घेण्याची गरज नाही मात्र बारामती मध्ये सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
बारामतीत काल आढळून आलेल्या 18 कोरोनाग्रस्तांच्या निकट संपर्कातील 62 जणांची प्रशासनाने कोरोनाची तपासणी केली, त्यामध्ये आतापर्यंत आलेल्या अहवालांमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली
बारामतीत रविवारी सकाळी नऊ व संध्याकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, हे सर्व इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या परिचारिकेच्या नातेवाईकांपैकी तसेच निकटच्या संपर्कातील होते, मात्र बारामती मध्ये आरोग्य खात्याने व महसूल प्रशासनाने या सर्व कोरोना रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला व एकूण 62 जणांची तपासणी करण्यात आली आज सकाळी सुरुवातीचे 14 नमुने निगेटिव्ह आले होते. त्यानंतर उर्वरित अहवालांची प्रतीक्षा होती.